रचना क्र. 176
अवघी इच्छा ही अनिवार
श्री पेठेकाका · null
null
अवघी इच्छा ही अनिवार ।
फिरवी दारोदार ॥धृ॥
रोज उगवता सवेच येई ।
मावळले तरि सोबत राही ।
धरिते स्वप्नांचा आकार ॥१॥
ती जन्माचे कारण होई ।
तळमळ जीवा सदैव देई ।
व्यापुनि अंतरंग व्यवहार ॥२॥
सात्त्विक राजस असो कशीही ।
तृप्तीलाही पुरुन उरे ही ।
वाटे माया ही साकार ॥३॥
इच्छा अपुले मरण क्षणोक्षण ।
दीना धरि रे तू सावधपण ।
तरणे इच्छेचा व्यापार ॥४॥
स्वार्थी इच्छा नको ठेवणे ।
गुरुइच्छेने अथवा जगणे ।
नेइल निरिच्छता भवपार ॥५॥
