रचना क्र. 175
कळेल का कोणा संतांचे महिमान
श्री पेठेकाका · null
null
कळेल का कोणा संतांचे महिमान ।
अंगी संतपण आल्यावीण ॥धृ॥
बाह्यात्कारी कोठे कळो येती संत ।
देश वेश रीत जगापरी ॥१॥
अंतरंगी मात्र अद्भुत ही शोभा ।
प्रभुप्रेमप्रभा अखंडित ॥२॥
न सांगता साधिती कितीकांचे हित ।
सगुण ही मूर्त भगवंताची ॥३॥
दीनभक्तां द्यावे थोडे संतपण ।
निदान महिमान कळो यावे ॥४॥
