रचना क्र. 151
पहा या सद्गुरूची कृपा
श्री गोंदवलेकर महाराज
पहा या सद्गुरूची कृपा ।
जो दाखवी स्वस्वरूपा ॥१॥
परब्रह्म तोचि गुरू ।
सद्गुरूंचे चरण धरू ॥२॥
सद्गुरुवाचुनी काय गती ।
ऐसे वेदही बोलती ॥३॥
दीनदासाचा हा भाव ।
सद्गुरू तोचि रामराव ॥४॥
रचना क्र. 151
श्री गोंदवलेकर महाराज
पहा या सद्गुरूची कृपा ।
जो दाखवी स्वस्वरूपा ॥१॥
परब्रह्म तोचि गुरू ।
सद्गुरूंचे चरण धरू ॥२॥
सद्गुरुवाचुनी काय गती ।
ऐसे वेदही बोलती ॥३॥
दीनदासाचा हा भाव ।
सद्गुरू तोचि रामराव ॥४॥