रचना क्र. 150
हरिचे गुण गाई । मनुजा
श्री निरंजन रघुनाथ · null
null
हरिचे गुण गाई । मनुजा
नरतनु गेल्यावरुते मनुजा करसिल मग काई ॥धृ॥
हस्तपादकर्णादिक इंद्रिय सावध जव काही ।
तववरि भगवत्प्रसाद सत्वरि संपादुनि घेई ॥१॥
वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयीं ।
मन चंचल चक्रापरि फिरते विषयांचे ठायी ॥२॥
श्रीहरिप्राप्तीसाठी शरण संताते जाई ।
निरंजनपद अविनाशी मग पावसि लवलाही ॥३॥
