रचना क्र. 128
चोराचिया संगे क्रमिता पै पंथ
श्री ज्ञानेश्वर महाराज · null
null
चोराचिया संगे क्रमिता पै पंथ ।
ठकूनिया घात करीतील ॥धृ॥
काम क्रोध लोभ घेऊनिया संगे ।
परमार्थासी निघे तोचि मूर्ख ॥१॥
बांधोनिया शिळा पोहू जाता सिंधू ।
पावे मतिमंदु मृत्यू शीघ्र ॥२॥
देह गेह भ्रांती सोडुनिया द्यावे ।
साधन करावे शुद्ध मार्गे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे तरीच साधेल ।
नाही तरी चळेल मध्यभागी ॥४॥
