रचना क्र. 127
पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वीची होसी
श्री नामदेव महाराज · null
null
पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वीची होसी ।
केशव न होसी अरे मना ॥१॥
आप ध्यासी तरी आपचि होसी ।
परि केशव न होसी अरे मना ॥२॥
वायु ध्यासी तरी वायुचि होसी ।
परि केशव न होसी अरे मना ॥३॥
आकाश ध्यासी तरी आकाशचि होसी ।
परि केशव न होसी अरे मना ॥४॥
नामा म्हणे जरी केशवासी ध्यासी ।
तरी केशवचि होसी अरे मना ॥५॥
