रचना क्र. 109
देवा तुझे द्वारी वसो ऐसे करी
श्री नामदेव महाराज · null
null
देवा तुझे द्वारी ।
वसो ऐसे करी ॥धृ॥
पाषाण करिसी तरी
पायरीचेनि मिषे ॥१॥
काष्ठ करिसी तरी
स्तंभाचेनि मिषे ॥२॥
वृक्ष करिसी तरी
तुलसीचेनि मिषे ॥३॥
पक्षी करिसी तरी
शुकाचेनि मिषे ॥४॥
श्वान करिसी तरी
उच्छिष्ठाचे मिषे ॥५॥
नामा म्हणे मज
कीर्तनाचे मिषे ॥६॥( भजनाचे मिषे )
