रचना क्र. 110
अवघा तो शकुन
श्री तुकोबा · null
null
अवघा तो शकुन ।
हृदयी देवाचे चरण ॥१॥
येथे नसता वियोग ।
लाभा उणे काय मग ॥२॥
संग हरिच्या नामाचा ।
शुचिर्भूत सदा वाचा ॥३॥
तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभकाळ अवघ्या दिशा ॥४॥
रचना क्र. 110
श्री तुकोबा · null
null
अवघा तो शकुन ।
हृदयी देवाचे चरण ॥१॥
येथे नसता वियोग ।
लाभा उणे काय मग ॥२॥
संग हरिच्या नामाचा ।
शुचिर्भूत सदा वाचा ॥३॥
तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभकाळ अवघ्या दिशा ॥४॥