रचना क्र. 107
नाही भाव नाही सेवा
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
नाही भाव नाही सेवा ।
शरण आलो तुज देवा ॥१॥
नाही योग नाही तप ।
जन्म घेउनि झाले पाप ॥२॥
नाही संध्या नाही स्नान ।
नाही घडले तीर्थाटन ॥३॥
नाही केले अध्ययन ।
नाही केले अन्नदान ॥४॥
नाही घडली गुरुसेवा ।
ऐसा पतित मी रे देवा ॥५॥
करुणा भाकी दास दीन ।
रामरूपी करा मन ॥६॥
