रचना क्र. 102
वीतभर पोट लागलेसे पाठी
श्री नामदेव महाराज · null
null
वीतभर पोट लागलेसे पाठी ।
साधुसंगे गोष्टी सांगू न देई ॥१॥
पोट माझी माता पोट माझा पिता ।
पोटाने ही चिंता लाविलीसे ॥२॥
पोट माझा बंधु पोट माझी बहीण ।
पोटाने हे दैन्य मांडिलेसे ॥३॥
विष्णुदास नामा पोटाकडे पाहे ।
अझुन किती ठाये हिंडवीसी ॥४॥
