रचना क्र. 101
संत समागम जोड । मनुजा
श्री सीताराम महाराज · null
null
संत समागम जोड । मनुजा ॥धृ॥
उत्तम जन्मा येउनि प्राण्या ।
दुर्जन संगति सोड ॥१॥
विषयविषाते न करी प्राशन ।
अंतक मोडिल खोड ॥२॥
सद्गुरुचरणी लीन होशी तरि ।
फेडिल मनिचे कोड ॥३॥
मन हे उन्मन करुनि पहासी ।
उगवे चिन्मय मोड ॥४॥
सीतारामी शरण होउनी ।
हृद्ग्रंथीते तोड ॥५॥
