रचना क्र. 56
मोरया, तूच मला तारी
श्री कृष्णदास महाराज · null
null
मोरया, तूच मला तारी ।
भवव्याधी जडली भारी ॥धृ॥
बहु जन्मांतर भोगित आलो ।
दु:खावर्ती व्यर्थ बुडालो ।
तयाचा संग मला मारी ॥१॥
सद्बुद्धी ही द्यावी दीनाला ।
श्रीरामी (हो) ठेवा मतीला ।
अभिमान मजला थोरी ॥२॥
कृष्णदास हात जोडुनी ।
करितसे हो तुम्हा विनवणी ।
करी पुनर्जन्म वारी ॥३॥
