रचना क्र. 55
आजवरी तुम्हा सांगितली मात
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
आजवरी तुम्हा सांगितली मात ।
नामाविण हित समजू नका ॥१॥
मानू नका नाम साधन लहान ।
तुम्हा माझी आण जीवेभावे ॥२॥
मानू नका सार संसार असार ।
दृश्य हा जोजार मानू नका ॥३॥
सोडू नका नाम धरू नका काम ।
नाही नाही नेम आयुष्याचा ॥४॥
दीनदास म्हणे सांगतो ते ऐका ।
अभ्यास वैखरी सोडू नका ॥५॥
