रचना क्र. 41
काही उपाय चालेना
श्री नरहरी सोनार · null
null
काही उपाय चालेना ।
काही स्वहित घडेना ॥१॥
काही केले नाही पुण्य ।
काय जन्मासी येऊन ॥२॥
केली नाही काही भक्ती ।
देही नाही हो विरक्ती ॥३॥
काही केले नाही तीर्थ ।
जन्म गेला अवघा व्यर्थ ॥४॥
व्यर्थ प्रपंच हा केला ।
अवघा सेवटी वाया गेला ॥५॥
गुरुकृपा होय जरी ।
नरहरी क्षणी उद्धरी ॥६॥
