रचना क्र. 37
अवघे निरंतर करा हा विचार
श्री नामदेव महाराज · null
null
अवघे निरंतर करा हा विचार ।
भवसिंधूचा पार तरिजे केवी ॥१॥
अवघे जन्म वाया गेले विषयसंगे ।
भुललेती वाउगे मायामोहे ॥२॥
अवघा वेळ करिता संसाराचा धंदा ।
वाचे वसो सदा हरिचे नाम ॥३॥
अवघ्या भावी एका विठ्ठलाते भजा ।
आर्ते पूजा करा हरिदासाची ॥४॥
अवघे सुख तुम्हा होईल अपैते ।
न याल मागुते गर्भवासा ॥५॥
नामा म्हणे अवघे अनुभवोनि पहा ।
सर्वकाळ राहा संतसंगे ॥६॥
