रचना क्र. 27
सांभाळ किती करणार, अमुचा
श्री पेठेकाका · null
null
सांभाळ किती करणार, अमुचा ॥धृ॥
नाव जाणे ना तुमचे ।
काय नाते तुमचे त्याचे ॥
पदोपदी अशा कितीका,
जन्मोजन्मी राखणार ! ॥१॥
तुम्हा ओळखती जे जे ।
येती भेटी कामकाजे ॥
हिंगजिऱ्याचे ग्राहक,
तरी तुम्ही जपणार ! ॥२॥
जे जे म्हणती आम्ही तुमचे ।
तरी होती क्षणि जगाचे ॥
कधी नाही बोल त्यांना,
ना कंटाळा करणार ! ॥३॥
शुद्धपणे वचनी तुमचे ।
मार्ग चालती नामाचे ॥
अंतर्बाह्य पोटी त्यांना,
आनंदुनी धरणार ! ॥४॥
इतुक्या जना उद्धरीता ।
कसे उपेक्षाल आम्हा आर्ता ॥
दीन म्हणे असो तसे ,
तुमचे पायी राहणार ! ॥५॥
सांभाळ तुम्ही करणार, खचितचि ॥
सांभाळ तुम्ही करणार, अमुचा ॥
