रचना क्र. 26
आता काही नाही हरीविण मज
श्री आनंदसागर · null
null
आता काही नाही हरीविण मज ।
तोचि माझी लाज सर्व रक्षी ॥१॥
लाज सर्व रक्षी अंतराचा साक्षी ।
व्यापुनी सर्व देशी उरलासे ॥२॥
उरलासे त्याचे नाम हे ठिकाण ।
संतसाधुजन जाणताती ॥३॥
जाणताती पूर्ण स्वात्मानुभवी ।
नामाची पदवी कोणा नाही ॥४॥
ऐसे नाम कळे सद्गुरूचे दासा ।
हरीचा भरवंसा गुरुपायी ॥५॥
