रचना क्र. 2
संक्षिप्त संतनमनमाला
श्री पेठेकाका · null
null
नमन त्रिवार संतमंडळी ।
जी येथे प्रतिमामूर्त जाहली ।
अमूर्तही प्रेमे विसावली ।
सदैव संतछायेत ॥१॥
नमन समर्थ रामदासांस ।
तसे स्वामी निरंजनांस ।
नमन श्री माणिकप्रभूंस ।
अक्कलकोट स्वामींस नमन ॥२॥
नमन श्री निंबरगी महाराजांस ।
तसे रामकृष्ण परमहंसांस ।
नमन पंत महाराजांस ।
तसे शेगावीच्या गजानना ॥३॥
नमन बीडकर महाराजांस ।
तसे नमन भाऊसाहेबांस ।
नमन श्री टेंब्ये स्वामींस ।
नमन श्री कृष्णदासांस ॥४॥
नमन श्री साईबाबांस ।
तसेच श्री अरविंदांस ।
नमन बाबा महाराजांस ।
जे. कृष्णमूर्तींस नमन ॥५॥
नमन माउली ज्ञानेश्वरांस ।
तसे नमन श्री तुकोबांस ।
नमन रमण महर्षींस ।
तसे श्री नमन गुरुदेवांना ॥६॥
नमन श्री तात्यासाहेबांस ।
तसे श्री मामासाहेबांस ।
नमन साध्वी अंबिकाबाईंस ।
तसे श्री स्वरूपानंदांस ॥७॥
नमन कलावती आईंस ।
तसे गणोरे बाबांस ।
नमन विश्वनाथ बाबांस ।
तसे श्री निसर्गदत्तांना ॥८॥
नमन श्री विनोबांना ।
तसे श्री नाना महाराजांना ।
नमन स्वामी वरदानंदांना ।
तसे स्वामी ब्रह्मानंदांस ॥९॥
नमन श्री तुकामाईंस ।
नमन श्री ब्रह्मचैतन्यांस ।
तसे प्रेमळ गुरुपदास ।
जे संतसत्पुरुषांचे मूळ ॥१०॥
आणि तया सर्वांना नमन ।
जे प्रतिमारूपे नसून ।
सूक्ष्म रूप धारण करून ।
असंख्य संत येथे ॥११॥
आपण सुखेनैव सदैव राहावे ।
आमुचे साधन वर्धिष्णु करावे ।
अनुसंधानी कर्तव्य व्हावे ।
ही कृपा असावी ॥१२॥
॥ सब संतन की जय ॥
