रचना क्र. 17
दृष्ट मंत्र
श्री पेठेकाका · null
null
( कुणा बरोबरीच्या लहानमोठ्या व्यक्तींना
काही वेगळी यशे, सन्मान मिळाले किंवा
त्यांच्याकडून काही असामान्य कर्तृत्व घडले
की, त्याचा निर्भेळ आनंद घेत असतानाही
क्वचित असूया, मत्सर अशा स्वरूपाचे
नकारात्मक भाव - ते पाहणाऱ्या व्यक्तींच्या
मनात त्याचा परिणाम या यशस्वी - कर्तृत्ववान
व्यक्तींवर होऊ शकतो. अशा वेळी ते दुर्भाव
जावेत म्हणून, फुले, मोहऱ्या इ.
वस्तूंनी दृष्ट काढण्यासाठी खालील मंत्र
उपयोगी पडू शकेल. )
कर्तृत्व, गौरव, यशे, सन्मान आले ।
जे वेगळे, अलौकिक कुणा दृष्टीस पडले ॥
त्याकारणे जरि कुठे दुर्भाव आले ।
मंत्रे तसे प्रभुकृपे ते नष्ट झाले ॥
(एवढे तीन शब्द शेवटी तीन वेळा म्हणणे.)
