रचना क्र. 13
संतचरित्र लेखनाची भूमिका
श्री पेठे काका
(इतर चरित्रांपेक्षा संतांचे चरित्र
लिहिणे हे एक वेगळे व सूक्ष्मदृष्टीचे
काम आहे. ते कष्टांबरोबरच कृपेनेच
साध्य होऊ शकते. अशा वेळी
संतचरित्र लिहिण्यापूर्वी नित्यनेमाने
खालील प्रार्थना करणे उपयोगी पडते.)
संतांचे जगती विहार करणे,
व्यक्तातले वागणे।
कळणे, त्यात कठीण अर्थ कळणे,
शब्दांत तो मांडणे।।
निष्ठेने किति मांडले तरि उरे
अव्यक्त जे जाणणे।
ज्याचे तोच चरित्र व्यक्त करवो
म्हणुनी कृपाळूपणे।।
***
