रचना क्र. 9
श्री ज्ञानदेव हरिपाठ
null
null
॥ १ ॥
दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी ।
तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या ॥१॥
हरि मुखॆं म्हणा, हरि मुखॆं म्हणा ।
पुण्याची गणना कॊण करी ॥२॥
असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी ।
वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदॆव म्हणॆ व्यासाचिया खुण ।
द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥
॥ २ ॥
चहूं वॆदीं जाण साही शास्त्रीं कारण ।
अठराही पुराणॆं हरीसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसॆं घॆ अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिवसमा ।
वाया तूं दुर्गमा न घालीं मन ॥३॥
ज्ञानदॆवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसॆ ॥४॥
॥ ३ ॥
त्रिगुण असार निर्गुण हॆं सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणाचॆं अगुण ।
हरिविण मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ।
जेथोनी चराचर त्यासी भजॆ ॥३॥
ज्ञानदॆवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
अनंत जन्मोनी पुण्य हॊय ॥४॥
॥ ४ ॥
भावॆंवीण भक्ति भक्तिवीणे मुक्ति ।
बळॆंवीण शक्ति बॊलूं नयॆ ॥१॥
कैसेंनि दैवत प्रसन्न त्वरित ।
उगा राहॆ निवांत शिणसी वाया ॥१॥
सायासॆ करिसी प्रपंच दिननिशीं ।
हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥
ज्ञानदॆव म्हणॆ हरिजप करणॆं ।
तुटॆल धरणॆं प्रपंचाचॆं ॥४॥
॥ ५ ॥
यॊग याग विधी यॆणॆं नोहे सिद्धि ।
वायाचि उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावॆंवीण दॆव न कळॆ निःसंदॆह ।
गुरुवीण अनुभव कैसा कळॆ ॥२॥
तपेंवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेंवीण हित कॊण सांगॆ?॥३॥
ज्ञानदॆव सांगे दृष्टांताची मात ।
साधूचॆ संगती तरणॊपाय ॥४॥
॥ ६ ॥
साधुबॊध झाला तो नुरॊनियां ठॆला ।
ठायींच मुराला अनुभवें ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्यॊती ।
ठायींच समाप्ती झाली जैशी ॥२॥
मॊक्षरॆखॆं आला भाग्यें विनटला ।
साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदॆवा गॊडी संगति सज्जनीं ।
हरि दिसॆ जनीं वनीं आत्मतत्त्वीं ॥४॥
॥ ७ ॥
पर्वताप्रमाणॆं पातक करणॆं ।
वज्रलॆप हॊणॆं अभक्तांसी ॥१॥
नाहीं ज्यासी भक्ति तो पतित अभक्त ।
हरिसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्या कैचा दयाळ पावॆ हरि ॥३॥
ज्ञानदॆवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वांघटीं पूर्ण एक नांदॆ ॥४॥
॥ ८ ॥
संतांचॆ संगति मनॊमार्ग गती ।
आकळावा श्रीपति यॆणॆं पंथॆ ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जिवाचा ।
आत्मा जॊ शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्त्व नाम साधिती साधन ।
द्वैताचॆं बंधन न बाधिजॆ ॥३॥
नामामृत गॊडी वैष्णवां लाधली ।
यॊगियां साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदॆव म्हणॆ नाम हॆं सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणॆ ॥६॥
॥ ९ ॥
विष्णुविणॆ जप व्यर्थ त्याचॆं ज्ञान ।
रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥
उपजॊनि करंटा नॆणॆं अद्वैत वाटा ।
रामकृष्णीं पैठा कैसा हॊय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान ।
तया कैचॆं कीर्तन घडॆ नामीं ॥३॥
ज्ञानदॆव म्हणॆ सगुण हॆं ध्यान ।
नामपाठ मौन प्रपंचाचॆं ॥४॥
॥ १० ॥
त्रिवॆणीसंगमीं नाना तीर्थॆं भ्रमी ।
चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥
नामासी विन्मुख तॊ नर पापिया ।
हरिविण धांवया न पवॆ कॊणी ॥२॥
पुराणप्रसिद्ध बॊलिलॆ वाल्मीक ।
नामॆं तिन्ही लॊक उद्धरती ॥३॥
ज्ञानदॆव म्हणॆ नाम जपे हरीचॆं ।
परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥
॥ ११ ॥
हरि उच्चारणीं अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रॆं ॥१॥
तृण अग्निमॆळॆं समरस झालॆं ।
तैसॆं नामॆं कॆलॆं जपतां हरि ॥२॥
हरि उच्चारण मंत्र हा अगाध ।
पळॆ भूतबाधा भये याचॆ ॥३॥
ज्ञानदॆव म्हणॆ हरि माझा समर्थ ।
न करवॆ अर्थ उपनिषदां ॥४॥
॥ १२ ॥
तीर्थ व्रत नॆम भावेंवीण सिद्धी ।
वायाची उपाधि करिसी जना!॥१॥
भावबळॆं आकळॆ येऱ्हवी नाकळॆ ।
करतळीं आंवळॆ तैसा हरी ॥२॥
पारियाचा रवा घॆतां भूमीवरी ।
यत्न परॊपरी साधन तैसॆं ॥३॥
ज्ञानदॆव म्हणॆ निवृत्ति निर्गुण ।
दिधलॆं संपूर्ण माझॆ हातीं ॥४॥
॥ १३ ॥
समाधि हरीची समसुखॆंवीण ।
न साधॆल जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचॆं वैभव अन्य नाहीं दुजॆं ।
ऎका कॆशवराजॆं सकळ सिद्धि ॥२॥
ऋद्धि सिद्धि निधि अवघीच उपाधि ।
जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥३॥
ज्ञानदॆवी रम्य रमलॆं समाधान ।
हरीचॆं चिंतन सर्वकाळ ॥४॥
॥ १४ ॥
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी ।
कळिकाळ त्यासी न पाहॆ दृष्टीं ॥१॥
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप ।
पापाचॆ कळप पळती पुढॆं ॥२॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
म्हणती जॆ वाचा तयां मॊक्ष ॥३॥
ज्ञानदॆवा पाठ नारायण नाम ।
पाविजॆ उत्तम निजस्थान ॥४॥
॥ १५ ॥
एक नाम हरि द्वैत नाम दुरी ।
अद्वैत कुसरी विरळा जाणॆ ॥१॥
समबुद्धि घॆतां समान श्रीहरी ।
शम दमा वरी हरि झाला ॥२॥
सर्वांघटी राम देहांदॆहीं एक ।
सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥
ज्ञानदॆवा चित्तीं हरिपाठ नॆमा ।
मागिलिया जन्मा मुक्त झालॊं ॥४॥
॥ १६ ॥
हरि नाम जपॆ तॊ नर दुर्लभ ।
वाचॆसी सुलभ रामकृष्ण ॥१॥
रामकृष्ण नामीं उन्मनी साधिली ।
तयासी लाधली सकळ सिद्धि ॥२॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आलॆ ।
प्रपंची निवालॆ साधुसंगॆ ॥३॥
ज्ञानदॆवीं नाम रामकृष्ण ठसा ।
येणॆं दशदिशा आत्माराम ॥४॥
॥ १७ ॥
हरिपाठ कीर्ति मुखॆं जरी गाय ।
पवित्रचि हॊय दॆह त्याचा ॥१॥
तपाचॆ सामर्थ्यॆं तपिन्नला अमूप ।
चिरंजीव कल्प वैकुंठीं नांदॆ ॥२॥
मतृ पितृ भ्राता सगॊत्र अपार ।
चतुर्भुज नर हॊऊनी ठॆलॆ ॥३॥
ज्ञान गूढ गम्य ज्ञानदॆवा लाधलॆं ।
निवृत्तीनें दिलें माझ्या हातीं ॥४॥
॥ १८ ॥
हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन ।
हरिविण सौजन्य नेणें कांही ॥१॥
तया नरा लाधलॆं वैकुंठ जॊडलॆं ।
सकळही घडलॆं तीर्थाटण ॥२॥
मनॊमार्गॆं गॆला तॊ येथॆं मुकला ।
हरिपाठीं स्थिरावला तॊचि धन्य ॥३॥
ज्ञानदॆवा गॊडी हरिनामाची जॊडी ।
रामकृष्णीं आवडी सर्वकाळ ॥४॥
॥ १९ ॥
वॆदशास्त्र पुराण श्रुतीचॆं वचन ।
ऎक नारायण सार जप ॥१॥
जप तप कर्म हरिविण धर्म ।
वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठी गॆलॆ तॆ निवांतचि ठॆलॆ ।
भ्रमर गुंतलॆ सुमनकळिकॆ ॥३॥
ज्ञानदॆवीं मंत्र हरिनामाचॆं शस्त्र ।
यमॆं कुळगॊत्र वर्जियॆलॆं ॥४॥
॥ २० ॥
नामसंकीर्तन वैष्णवांची जॊडी ।
पापॆं अनंत कॊटी गॆलीं त्यांचीं ॥१॥
अनंत जन्मांचॆं तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
यॊगयाग क्रिया धर्माधर्म माया ।
गॆलॆ तॆ विलया हरिपाठीं ॥३॥
ज्ञानदॆवी यज्ञयाग क्रिया धर्म ।
हरिविण नॆम नाहीं दुजा ॥४॥
॥ २१ ॥
काळ वॆळ नाम उच्चारितां नाहीं ।
दॊन्ही पक्ष पाही उद्धरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दॊषां हरण ।
जडजीवां तारण हरि एक ॥२॥
हरि नाम सार जिव्हा या नामाची ।
उपमा त्या दैवाची कॊण वानी?॥३॥
ज्ञानदॆवा सांग झाला हरिपाठ ।
पूर्वजां वैकुंठ मार्ग सॊपा ॥४॥
॥ २२ ॥
नित्य नॆम नामीं तॆ प्राणी दुर्लभ ।
लक्ष्मीवल्लभ तयांजवळी ॥१॥
नारायण हरि नारायण हरि ।
भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥
हरिविण जन्म तो नरकची पैं जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी हॊय ॥३॥
ज्ञानदॆव पुसॆ निवृत्तिसी चाड ।
गगनाहूनी वाड नाम आहॆ ॥४॥
॥ २३ ॥
सात पांच तीन दशकांचा मॆळा ।
एकतत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥
तैसॆं नव्हॆ नाम सर्वत्र वरिष्ठ ।
येथॆं कांहीं कष्ट न लागती ॥२॥
अजपा जपणॆं उलट प्राणाचा ।
तेथॆंही मनाचा निर्धारु असॆ ॥३॥
ज्ञानदॆवा जिणॆं नामॆंविण व्यर्थ ।
रामकृष्णीं पंथ क्रमियॆला ॥४॥
॥ २४ ॥
जप तप कर्म क्रिया नॆम धर्म ।
सर्वांघटीं राम भावशुद्ध ॥१॥
न सॊडी हा भावॊ टाकी रॆ संदॆहॊ ।
रामकृष्णीं टाहॊ नित्य फॊडी ॥२॥
जात वित्त गॊत कुळ शीळ मात ।
भजे कां त्वरित भावनायुक्त ॥३॥
ज्ञानदॆव ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
वैकुंठभुवनीं घर कॆलॆं ॥४॥
॥ २५ ॥
जाणीव नॆणीव भगवंतीं नाहीं ।
हरि उच्चारणीं पाहीं मॊक्ष सदा ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा ।
तॆथॆं कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तॆथील प्रमाण नॆणवॆ वॆदांसी ।
तॆ जीवजंतूंसी कॆवीं कळॆ? ॥३॥
ज्ञानदॆव फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ कॆलॆं असें ॥४॥
॥ २६ ॥
एकतत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरीसी करुणा यॆईल तुझी ॥१॥
तॆं नाम सॊपॆं रॆ रामकृष्ण गॊविंद ।
वाचॆसी सद्गद जपॆ आधी ॥२॥
नामापरतॆं तत्त्व नाहीं रॆ अन्यथा ।
वाया आणिका पंथा जाशी झणी ॥३॥
ज्ञानदॆवा मौन जपमाळ अंतरीं ।
धरॊनी श्रीहरि जपॆ सदा ॥४॥
॥ २७ ॥
सर्व सुख गॊडी साही शास्त्रें निवडी ।
रिकामा अर्धघडी राहूं नकॊ ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वाया यॆरझार हरिविण ॥२॥
नाम मंत्र जप कॊटी जाईल पाप ।
रामकृष्णीं संकल्प धरूनी राहॆ ॥३॥
निजवृत्ति हे काढी सर्व माया तॊडी ।
इंद्रियां सवडी लपू नकॊ ॥४॥
तीर्थींव्रतीं भाव धरी रॆ करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान ।
समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥
