रचना क्र. 4
आम्हा काय उचित
श्री ज्ञानेश्वर माउली · null
null
आम्हां काय उचित ।
तें पाहतां न स्फुरे येथ।
जे मोहें येणें चित्त ।
व्याकूळ माझें॥५५॥
तिमिरावरुद्ध जैसें ।
दृष्टीचें तेज भ्रंशे।
मग पांसींच असतां न दिसे ।
वस्तुजात॥५६॥
देवा मज तैसे जाहलें ।
जें मन हें भ्रांती ग्रासिलें।
आतां काय हित आपुलें ।
तेंही नेणें॥५७॥
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें ।
निकें तें आम्हां सांगावें।
जे सखा सर्वस्व आघवें ।
आम्हांसि तूं॥५८॥
तूं गुरु बंधु पिता ।
तूं आमची इष्ट देवता।
तूंचि सदा रक्षिता ।
आपदीं आमुतें॥५९॥
जैसा शिष्यांतें गुरु ।
सर्वथा नेणे अव्हेरु।
कीं सरितांतें सागरु ।
त्यजी केवीं॥६०॥
नातरी अपत्यातें माये ।
सांडूनि जरी जाये ।
तरी तें कैसेंनि जिये ।
ऐकें कृष्णा॥६१ ॥
तैसा सर्वांपरी आम्हांसि ।
देवा तूंचि एक आहासि।
आणि बोलिलें जरी न मानिसी ।
मागील माझें॥६२॥
तरी उचित काय आम्हां ।
जें व्यभिचरेना धर्मा।
तें झडकरी पुरुषोत्तमा ।
सांगें आतां॥६३॥
