रचना क्र. 70
श्री स्वामी स्वरूपानंदांची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय जय आरती स्वरूपानंदा,
सोहम् हंसा आत्मानंदा ।। धृ ।।
देशभक्तिने ओढ लाविली ।
सामान्यांपरि वाट आखिली ।
नियतीला ती मान्य नसे ही, देवकृपा झाली ।। १ ।।
निमित्त झाली क्षीण प्रकृती ।
महत्कार्य ते देव योजिती ।
स्वस्थानी अन् आत्मध्यानी, शांतिमूर्ति घडली ।। २ ।।
उपासिता श्री सद्गुरुचरणा ।
देव प्रकाशित करि आचरणा ।
सोहम् सोहम् ध्यानी ध्याता, येरझार नुरली ।। ३ ।।
देव ठेवितो तसे रहावे ।
स्वानंदा परि हलू न द्यावे ।
दीनजनांनी श्वासावरती, लक्ष असू द्यावे ।। ४ ।।
