रचना क्र. 69
श्री जे. कृष्णमूर्तींची आरती
श्री पेठेकाका · null
null
नमुया, जय जे. कृष्णमूर्ती ।। धृ ।।
योग असंग्रह त्याग विलक्षण ।
करुनि जाणले समग्र जीवन ।
दुःखाकारण एकचि हे मन ।
जगकल्याणा तनमन अर्पण ।
दीना दिधलि गती ।। १ ।।
ज्ञानामध्ये स्वरूपज्ञान ।
शोधामध्ये मानसशोधन ।
प्रश्नांतच ते उत्तरशोधन ।
वृत्तीपालट हे परिवर्तन ।
तळमळ करि प्रगती ।। २ ।।
नित्य नम्र त्या कळते जीवन ।
शिक्षण, वय ना कुठले बंधन ।
वृक्ष दगड डोंगरही चेतन ।
एकसंध आनंदी जीवन ।
‘मी’ नुरता शांती ।। ३ ।।
