रचना क्र. 46
श्री बाबा महाराजांची आरती
श्री पेठेकाका · null
null
कृतज्ञभावे जयजय बाबा महाराजांना स्मरू ।
जगी असूनी अखंड ध्यानी निजजनकल्पतरू ॥धृ॥
बुद्धिकृपेने अपरा विद्या अर्थाजन झाले ।
सूक्ष्म जाणता तनमन तुमचे गुरुचरणी विरले ॥१॥
सूचक भाषा प्रेमळ बोली वेळी उग्र तुम्ही ।
दीन बालका कसे करूनी न्यावे निजधामी ॥२॥
