रचना क्र. 45
श्री विश्वनाथ महाराजांची आरती
श्री पेठेकाका · null
null
नामनिष्ठ, गुरुनिष्ठ माउली, विश्वनाथ माउली ।
जय जय विश्वनाथ माउली ॥धृ॥
डव्ह्यात शेतीमजूरी केली ।
कष्ट करित प्रारब्धे सरली ।
सर्पदंश आपत्ती आली ।
अपमृत्यूचे निमित्त करूनी, नाथकृपा प्रकटली ॥१॥
श्री गुरुनंगेनाथ सावली ।
तीव्र तपाला छत्र लाभली ।
निष्ठा पुरती शुद्ध जाहली ।
तुकाराम गुरुकृपे जाहले, विश्वनाथ माउली ॥२॥
योगभक्ति शुद्धीस पाळुनी ।
दूर द्वैतदंभास सारुनी ।
खर्या भक्तिची ओळख घडवुनि ।
दीनजिवांना डव्हा पंढरी, भूवरती झाली ॥३॥
