रचना क्र. 512
वाटे गुरूचे महिमान
श्री पेठेकाका · null
null
वाटे गुरूचे महिमान ।
कळुनि व्हावे जीवन धन्य ।। १ ।।
परि ते ज्ञानबळे ना कळे ।
कर्मधर्म काहि न चाले ।।२ ।।
माझे मीपण ठरे फोल ।
नित्य शरण तो जाणेल ।। ३ ।।
काय सांगू गुरुचि मात ।
शिष्य ब्रह्मरूप करित ।। ४ ।।
दीन म्हणे जो अनुभवी ।
त्याची जीवनबोली दैवी ।। ५ ।।
