रचना क्र. 511
दृष्टी पुरे प्रपंचाला
श्री पेठेकाका · null
null
दृष्टी पुरे प्रपंचाला |
ज्ञानदृष्टी परमार्थाला || १ ||
अनंत सात्विक कर्मे होती |
तेव्हा होय सद्गुरुप्राप्ती || २ ||
जागे करिती ते प्रपंची |
स्मृती देती भगवंताची || ३ ||
मग तेथे मन ना गुंते |
संचित जैसे तैसे घडते || ४ ||
अभंग निष्ठा ज्याचे हृदयी |
गुरु नेती देवापायी || ५ ||
दीना गुरुबोधांजन भेटो |
अवघा विठ्ठल हृदयी दाटो || ६ ||
