रचना क्र. 468
होता रे ऐसा
श्री रंगनाथ स्वामी · null
null
होता रे ऐसा, कैसा मी ठकलो ?
अपुल्या निजहिता मुकलो ! ॥धृ॥
माझ्या स्वरूपाचा अंत पहाता,
कुंठित वेदान्त ।
ऐसा व्यापक मी हा असता,
म्हणवि औट हात ॥१॥
निजानंदपद अविनाशी हो,
त्यजिले म्या त्यासी ।
टाकुनि मणि घे काचवटी तैसा,
रमलो विषयांसी ॥२॥
नवल श्रीगुरुचि करणी चिद्रुप,
प्रकाशला तरणी ।
द्वैत नासुनिया तम ते भरली,
निजरंगे भरणी ॥३॥
