रचना क्र. 467
जय जय आरति
अज्ञात · null
null
जय जय आरति श्री गुरुराया ।
सद्गुरुराया ।
नमितो तव पदि संहरि माया ॥धृ॥
मी जिव हा भ्रम द्वैतपसारा,
द्वैतपसारा ।
वारुनि दिधला अद्वैतसारा ॥१॥
परमपरात्पर चिन्मयखाणी,
चिन्मयखाणी ।
शतमुख स्तविता मंदलि वाणी ॥२॥
जगज्जिवन प्रभु मंगलधामा,
मंगलधामा ।
नामरुपातित तू अभिरामा ॥३॥
