रचना क्र. 457
करिता देवार्चन
श्री तुकोबा · null
null
करिता देवार्चन ।
घरा आले संतजन ॥१॥
देव सारावे परते ।
संत पूजावे आरते ॥२॥
शाळिग्राम विष्णू मूर्ती ।
संत का हो भलते याती ॥३॥
तुका म्हणे संधी संधी ।
अधिक वैष्णवांची मांदी ॥४॥
रचना क्र. 457
श्री तुकोबा · null
null
करिता देवार्चन ।
घरा आले संतजन ॥१॥
देव सारावे परते ।
संत पूजावे आरते ॥२॥
शाळिग्राम विष्णू मूर्ती ।
संत का हो भलते याती ॥३॥
तुका म्हणे संधी संधी ।
अधिक वैष्णवांची मांदी ॥४॥