रचना क्र. 449
भगवंत निजभक्तांची
श्री रंगनाथ स्वामी · null
null
भगवंत निजभक्तांची,
संकटे दूर करितो ॥
कांताकांचन पुत्रधन ।
भाग्य वैभव संपन्न ।
होता करितिल आनोआन ।
म्हणउनी धन हरितो ॥१॥
मोहमदे मदोन्मत्त ।
कदा होऊ नेदी चित्त ।
त्याचे करणे, ते स्वहित ।
म्हणवुनी पाश वारितो ॥२॥
सर्वसंग परित्यागी ।
जे निरपेक्ष वीतरागी ।
निजानंदे सर्वसंगी ।
सत्वर उद्धरितो ॥३॥
