रचना क्र. 448
तुजविण कोण दया करणार
श्री कृष्णदास महाराज · null
null
तुजविण कोण दया करणार ॥धृ॥
श्री जगदीश हरे सुखसिंधो ।
म्हणता अघ हरणार ॥१॥
चिंताडोही बुडता तेथे ।
येउनि कर धरणार ॥२॥
टाकू नको मज, निज यश राखी ।
विश्वाते भरणार ॥३॥
राजारामी लीन प्रसादिक ।
वचना अनुसरणार ॥४॥
