रचना क्र. 433
हे शिवशंभो
श्री पेठेकाका · null
null
हे शिवशंभो, तव सत्स्वरुप कळो ।
सद्भक्तीचा लाभ जनांस मिळो ॥धृ॥
डोंगर निर्जन निबिड अरण्ये ।
कशास तुमची निवासस्थाने ।
विषे हलाहल सर्प चंद्रमे ।
त्रिशूल डमरू वल्कल भस्मे ।
शांतिदेव हा, जगतो कैसा कळो ॥१॥
अल्प साधने प्रसन्न होता ।
असुरनरसुरा वरही देता ।
उत्पत्तिस्थिति विलय पाहता ।
नृत्यहि वरिता ध्यानहि धरिता ।
मायेमध्ये, शिव जीवांस मिळो ॥२॥
