रचना क्र. 429
देवा थोर तुझे हे दान
श्री पेठेकाका · null
null
देवा थोर तुझे हे दान
देह दिले मज रत्न ॥१॥
आता देई मज जाणीव
मी मी माझे नसो भाव ॥२॥
नको राहाणे सुखात
सदा ठेवी मज कष्टात ॥३॥
सात्त्विक दैवी कर्मी नित्य
देह मन राहो रत ॥४॥
दीन म्हणे देवराया
संकीर्तनी पडो काया ॥५॥
