रचना क्र. 423
जिवलग सोयरा करा स्वामीराज
श्री स्वामीसुत महाराज
जिवलग सोयरा करा स्वामीराज ।
भक्ति पंथ सहज होईल तो ॥१॥
एकविध भक्ति ठेवुनी चरणी ।
त्याचे नाम वदनी जपा भावे ॥२॥
आणिका ठायी मन जाता, ते आवरा ।
स्वामीचरणी धरा दृढभाव ॥३॥
दुर्धर हा काळ ग्रासील बा जेव्हा ।
सोडवील तेव्हा स्वामी माझा ॥४॥
अन्तकाळी तुम्हा कोणी नये कामा ।
न्याया निजधामा स्वामीविण ॥५॥
पुढील ती वाट अवघड हो मोठी ।
काळ उठाउठी जाईल ॥६॥
स्वामीदासासी हो भीत असे काळ ।
करीत सांभाळ स्वामी माझा ॥७॥
स्वामीसुत म्हणे भक्तिपंथ धरा ।
स्वामी हा सोयरा करावया ॥८॥
