रचना क्र. 402
रामकृपेची छाया
श्री कृष्णदास महाराज · null
null
रामकृपेची छाया माझा मारुति प्राणसखा ।
त्रिभुवनि वाटे धन्य जाहलो पाहुनिया सुमुखा ॥धृ॥
मारुतिराया त्रिभुवनवन्द्या जय जय बलभीमा ।
मात्रा तूझे नामचि देवा नासाया कामा ।
माङ्गल्याचे निधान केवळ निवास तू प्रेमा।
माय माझि गे पूर्ण दयाघन पदनतविश्रामा ॥१॥
रुद्र-रूप तव भयद दुर्जना सान जिथे मेरू ।
रुचिर दिसे ते भक्ता लावी देहभान विसरू ।
रुतूनिया भवपंकि पामरे लागति शोक करू ।
रुदन ऐकुनी धावत येसी स्वभक्तकल्पतरू ॥२॥
तिमिरे ब्रह्मी विश्व भासते सर्प दोरिवरती ।
तिथे ज्ञानरवि उदय पावता विश्व सर्प नसती ।
तिलांजली ती देउनि आता गुणकर्मावरती ।
तिलक भक्तजनि या हनुमन्ता कृष्ण करी प्रणति ॥३॥
