रचना क्र. 379
भाविक आवडती
श्री रंगनाथ स्वामी · null
null
भाविक आवडती, ते मज,
भाविक आवडती ॥धृ॥
अर्थी, आर्ती, जिज्ञासू नर,
ते न मना पडती ॥१॥
निद्रिस्ताते जागृत करुनी,
जे भावे रमती ॥२॥
अहंवृत्तीच्या टाकुनि भावा,
ऐक्यरुपे जडती ॥३॥
वेडे होउनि निजानंदी,
निजरंगी रमती ॥४॥
