रचना क्र. 375
सोडुनीया घर जाशी देशावर
श्री जयरामनाना महाराज · null
null
सोडुनिया घर जाशी देशावर ।
परि बरोबर प्रारब्ध ते ॥धृ॥
जेथे जाशी तेथे प्रारब्ध सांगाती ।
काम क्रोध येती बरोबर ॥१॥
घरी तेची दारी विचार तू करी ।
वृथा वाऱ्यावरी हिंडू नये ॥२॥
जयराम म्हणे मन होय स्वस्थ ।
ऐसा धरी पंथ सुखी होय ॥३॥
