रचना क्र. 355
कथा त्रिवेणीसंगम
श्री तुकोबा · null
null
कथा त्रिवेणीसंगम,
देव भक्त आणि नाम ।
तेथीचे उत्तम,
चरणरज वंदिता ॥धृ॥
जळति दोषांचे डोंगर,
शुद्ध होती नारी नर ।
गाती ऐकती सादर,
जे पवित्र हरिकथा ॥१॥
तीर्थे तया ठाया,
येती पुनीत व्हावया ।
पर्वकाळ पाया,
तळी वसे वैष्णवा ॥२॥
अनुपम्य हा महिमा,
नाही द्यावया उपमा ।
तुका म्हणे ब्रह्मा,
नेणे वर्णू या सुखा ॥३॥
