रचना क्र. 354
पंढरीचे उपकार
श्री पेठेकाका · null
null
पंढरीचे उपकार जगावर पंढरीचे उपकार ।
कधी न जे फिटणार, जन हो, कधी न जे फिटणार ॥धृ॥
मायेला जे, भुलले जग हे ।
विकार, लोभे क्षोभत जन हे ।
त्यात शांत अवतार, विठूचा, त्यात शांत अवतार ॥१॥
स्वार्थ, क्षुद्रता गावे दिसती ।
नकाशात या जगात किती ती ।
परी मनी दिसणार, विठोबा, परी मनी दिसणार ॥२॥
प्रेम, थोरपण, विशालता ती ।
सज्जनांस जी जपते जगती ।
गुणरूपे आकार, देव धरि, गुणरूपे आकार ॥३॥
दीना, दुबळ्या, अपराधी वा ।
करिती जे कुणि त्याचा धावा ।
त्यांस सबळ आधार, निर्गुण, त्यांस सबळ आधार ॥४॥
