रचना क्र. 352
ज्याने खरा देव जाणिला
श्री पेठेकाका · null
null
ज्याने खरा देव जाणिला ।
त्याचा भाग्यभानू उदेला ॥धृ॥
त्यासी भव, भ्रम नाही ।
खरा कर्ता तोचि पाही ॥१॥
त्यासी प्रपंचाचे भय नाही ।
जाणे येणे कोठे नाही ॥२॥
त्यासी देव दूर नाही ।
जाई तेथे संगे राही ॥३॥
दीन म्हणे जाणा देव ।
आपुलीच आहे ठेव ॥४॥
