रचना क्र. 14
कशी खंत वाटेना
श्री रंगनाथ स्वामी
हृदयी असता हरी भेटेना ।
याचि खंत वाटेना ॥
कशी खंत वाटेना ॥धृ॥
जन्मोजन्मान्तरी अंतरला हरी ।
विषय भोगी मन विटेना ॥१॥
दिवसो दिवसे लोटले श्रवणी श्रवण दाटले ।
भ्रांती पडदा अजुनि फाटेना ॥२॥
अनुतापे तापुनी शुद्ध सत्त्व होऊनी
निज रंगाचा ठसा उमटेना॥३॥
