रचना क्र. 329
भाव धरी तया
श्री तुकोबा · null
null
भाव धरी तया तारील पाषाण ।
दुर्जना सज्जन काय करी ॥धृ॥
करिता नव्हे नीट श्वानाचे हे पुच्छ ।
खापरा परीस काय करी ॥१॥
काय करील तया साकरेचे आळे ।
बीज तैसी फळे येती तया ॥२॥
तुका म्हणे वज्र भंगे एकवेळ ।
कठीण हा खळ तयाहूनी ॥३॥
