रचना क्र. 328
सुंदर ते ध्यान
श्री तुकोबा · null
null
सुंदर ते ध्यान ।
उभे विटेवरी ।
कर कटावरी ।
ठेवूनिया ॥धृ॥
तुलसीहार गळा ।
कासे पीतांबर ।
आवडे निरंतर ।
तेचि रूप ॥१॥
मकरकुंडले ।
तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणी ।
विराजित ॥२॥
तुका म्हणे माझे ।
हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख ।
आवडीने ॥३॥
