रचना क्र. 317
साईबाबांची आरती
श्री पेठेकाका · null
null
आम्हा आर्तांच्या नाथा । चरणी ठेवुनिया माथा ।
ओवाळू आरती, साई शिर्डीच्या नाथा ॥धृ॥
आधी व्याधी असती दुःखे अपार या जगती ।
कर्मफळे ती समजुन जगण्या बळ बाबा देती ।
न्यायी ईश्वरी सत्ता । सबुरी आणुनिया चित्ता ॥१॥ ओवाळू...
अहंपणा घालविला सांगुन मागण्यास भिक्षा ।
दाने, परोपकारे केली संचयास शिक्षा ।
मोजी कणकण हा घेता । देई अनेकपट दाता ॥२॥ ओवाळू...
पशुपक्षी अन् झाडे माणुस ईश्वरमय आहे ।
माणुसकी हा एकच आता धर्म पुढे आहे ।
पाळण्या शक्ती दे भक्ता । दीना अवघ्या तू त्राता ॥३॥ ओवाळू...
