रचना क्र. 316
श्री पांडुरंगाची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय पांडुरंगा विठ्ठला सखया ।
ओवाळु स्मरुनी वत्सला सदया ॥धृ॥
ही ओढ कुठुनि तू लावियली भक्तीची ।
हे भाग्य उजळले जाग दिली देवाची ।
माळावर कलिच्या बाग तुझी सत्याची ।
या अभक्त जगती रक्षण भक्तां देशी ॥१॥
ये अपात्र कुणि वा पात्र तुझ्या पायाशी ।
तू दर्शनमात्रे, स्मरणे पावन करिशी ।
जे प्रेमळ, दुर्लभ संत हृदयि तू धरिशी ।
दे अपात्र दीना थारा तव पायाशी ॥२॥
