रचना क्र. 308
श्री हरिपाठाची आरती
श्री पेठेकाका · null
null
आरती हरिपाठा ।
झाल्या सोप्या भक्तिवाटा ॥
आरती हरिपाठा ॥धृ॥
सत्तावीस सुमनांची ।
कल्याणार्थ माळ झाली ।
ज्ञानदेवे कृपा केली ।
भक्तां नित्यसंध्या झाली ॥१॥
हरिपाठ संकीर्तन ।
देवकीर्तीचे गायन ।
मुखे हरि उच्चारण ।
थोर घडते साधन ॥२॥
नाम हाचि दिव्य मार्ग ।
सुखे घरा येई स्वर्ग ।
द्वैत, भेद होई त्याग ।
सर्व विष्णुमय जग ॥३॥
जीवनाचे सार वाटिले ।
गूढ तत्त्व सोपे केले ।
दीन जीव धन्य झाले ।
हरिनामे उद्धरले ॥४॥
