रचना क्र. 303
विश्वात्मकाची आरती
श्री पेठेकाका · null
null
विश्वात्मका तुजला देवा ओवाळू आरती ।
तुझ्या कृपेचा सदैव होवो बोधपाठ चित्ती ॥धृ॥
१
जन्मोजन्मी प्रपंच करुनी भागलो आता ।
माझे माझे भरुनी ओंजळ मोकळी आता ॥१॥
नातीगोती मानमान्यता पैसा पोकळ ।
स्वार्थी जगती कुणी न भेटे निखळ प्रेमळ ॥२॥
कल्पनेतले मिळण्यासाठी आजवरी श्रमलो ।
ज्याची त्याची कास धरूनी दूर किती गेलो ॥३॥
चैतन्यात्मक तुझीच होती प्रेमळ संगती ।
भान तिचे मज आले आता नित्य टिको चित्ती ॥४॥
२
निसर्गातले रूप अचेतन तसे सचेतन ।
कधी थबकलो नाही घेण्या तुमचे दर्शन ॥१॥
सुष्टदुष्ट वा क्षुद्रभव्य वा ऐलपैल भासो ।
तुजला प्रिय कण विश्वामधला कुणी कुणा त्रासो॥२॥
सर्वांचे हित नित्य घडावे हेतू तव ठायी ।
समग्रतेचे भान मला दे कृतीत अन् हृदयी ॥३॥
तुझे,तुझ्यास्तव,तव इच्छेने जगेन जीवन ।
दीन जिवांना तुझे घडू दे सदैव दर्शन ॥४॥
