रचना क्र. 279
अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे
श्री दासगणू महाराज · null
null
अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे ।
महान पापी मी मज परी तू आपुला म्हणणे ॥१॥
पतितपावन ऐसे आपणा नाम धरिलेसी ।
आता पतिता उपेक्षिणे योग्य नव्हे तुजसी ॥२॥
दीनानाथा विश्वंभरा करूणावतारा ।
दासगणूला नकोस लावू विन्मुख माघारा ॥३॥
